Skip to content
लूक १२:५४-५९

लूक १२:५४-५९

५४
ते लोकांना म्हणाले: “पश्चिमेकडे ढग जमलेले तुम्हाला दिसले, म्हणजे तुम्ही लगेच म्हणता, ‘आता पाऊस पडेल,’ आणि तो पडतो.
५५
आणि जेव्हा दक्षिणेकडील वारा वाहू लागतो, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आज उकडेल’ आणि तसे होते.
५६
ढोंगी जनहो! पृथ्वीवरील व आकाशात होणार्‍या बदलांचे अर्थ तुम्हाला कळतात, परंतु आताच्या काळाच्या चिन्हांचा अर्थ तुम्हाला का लावता येत नाही?
५७
“जे काही योग्य आहे, त्याविषयी तुम्हीच स्वतःसाठी न्याय का करीत नाही?
५८
ज्यावेळी तुम्ही शत्रूबरोबर न्यायालयात जाण्यापूर्वी वाटेत एकत्रित असतानाच संबंध नीट करा, नाहीतर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाकडे ओढून नेईल, न्यायाधीश अधिकार्‍याच्या हाती सोपवून देईल आणि अधिकारी तुम्हाला तुरुंगात टाकेल.
५९
मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options