लूक ११:३९-४४
३९
ते पाहून प्रभू त्याला म्हणाले, “तुम्ही परूशी लोक थाळी व प्याला बाहेरून स्वच्छ करता, पण तुमची मने लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेली असतात.
४०
अहो मूर्ख लोकांनो! ज्याने बाहेरील भाग घडविला त्यानेच अंतर्भाग सुद्धा घडविला नाही काय?
४१
तुमच्या अंतर्भागाबद्धल बोलायचे तर गरिबांना उदारता दाखवा म्हणजे तुम्हाला सर्वकाही शुद्ध असल्याचे आढळेल.
४२
“तुम्हा परूश्यांना धिक्कार असो! तुम्ही पुदिना, शेपू व बागेतील प्रत्येक प्रकारची भाजी यांचा दशांश देत असला, तरी तुम्ही न्याय आणि परमेश्वराची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही दशांश निश्चितच द्यावा, पण ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडू नयेत.
४३
“अहो परूश्यांनो, तुम्हाला धिक्कार असो! कारण भरबाजारात लोकांकडून मुजरे घेणे व सभागृहामध्ये प्रमुख जागेवर बसणे हे तुम्हाला प्रिय आहे.
४४
“तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही खुणा नसलेल्या कबरांसारखे आहात, लोकांना त्यावरून चालताना त्यांना माहीत होत नाही.”
Settings