Skip to content
लूक १०:२५-२९

लूक १०:२५-२९

२५
एका प्रसंगी एक नियमशास्त्र तज्ञ येशूंची परीक्षा पाहावी म्हणून आला, “गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्याकरिता मी काय करावे?”
२६
येशू म्हणाले, “याबाबत नियमशास्त्र काय म्हणते? तू काय वाचतोस?”
२७
त्याने उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचा परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने’ आणि ‘तुमच्या पूर्णशक्तीने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा आणि जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’”
२८
“अगदी बरोबर सांगितलेस,” येशू म्हणाले, “तसेच कर म्हणजे तू जगशील.”
२९
तरी आपले न्यायीपणाचे समर्थन करण्यासाठी त्याने येशूंना विचारले, “माझा शेजारी कोण?”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.