Перейти к содержимому
लेवीय ९:८-२२

लेवीय ९:८-२२

तेव्हा अहरोन वेदीजवळ गेला आणि त्याने स्वतःच्या पापासाठी गोर्‍ह्याचा वध केला.
मग अहरोनाचे पुत्र त्या गोर्‍ह्याचे रक्त घेऊन त्याच्याकडे आले आणि अहरोनाने आपले बोट रक्तात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले; उर्वरित रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतून दिले.
१०
याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला.
११
कातडे व मांस मात्र त्याने वस्तीबाहेर नेऊन अग्नीत जाळले.
१२
मग अहरोनाने स्वतःच्या होमबलीचा वध केला आणि त्या बलीचे रक्त त्याच्या पुत्रांनी त्याला सोपवून दिले व त्याने ते वेदीभोवती शिंपडले.
१३
मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला.
१४
त्याने आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासह त्यांचा होम केला.
१५
मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला.
१६
नंतर त्याने होमार्पण आणले आणि सूचना दिल्याप्रमाणे त्याचे अर्पण केले.
१७
मग त्याने सकाळच्या होमार्पणाबरोबर अन्नार्पणही सादर केले व त्यातील मूठभर धान्य वेदीवर जाळून टाकले.
१८
यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्‍ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले.
१९
परंतु त्याने गोर्‍ह्याची व मेंढ्याची चरबी, म्हणजे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा
२०
त्या बलींच्या उरांवर ठेवली, मग अहरोनाने त्या सर्वांचा वेदीवर होम केला.
२१
मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने ऊर व उजवी मांडी यांचे याहवेहसमोर ओवाळणीचे अर्पण केले.
२२
मग अहरोनाने आपले हात लोकांकडे उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जिथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पण वाहिले होते तिथून उतरून तो खाली आला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options