Skip to content
लेवीय २७:२-१६

लेवीय २७:२-१६

२
“इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा एखादा मनुष्य याहवेहला समर्पणाचे विशेष नवस करेल, तेव्हा त्या व्यक्तीचे मूल्य पुढीलप्रमाणे ठरवावे.
३
वीस ते साठ वर्षे वयाच्या पुरुषाचे मूल्य पवित्रस्थानाच्या वजनानुसार चांदीचे पन्नास शेकेल असावे,
४
स्त्रीसाठी तिचे मूल्य चांदीचे तीस शेकेल असावे;
५
पाच ते वीस वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी, पुरुषाचे मूल्य वीस शेकेल असावे आणि स्त्रीसाठी दहा शेकेल असावे;
६
एक महिना ते पाच वर्षे वयाच्या पुरुषाला चांदीचे पाच शेकेल आणि स्त्रीसाठी चांदीचे तीन शेकेल असावे;
७
साठ वर्ष आणि अधिक वर्षाच्या पुरुषाचे मूल्य चांदीचे पंधरा शेकेल असावे आणि स्त्रीसाठी दहा चांदीचे शेकेल असावे.
८
फारच गरिबीमुळे नवस फेडण्यासाठी मनुष्याला इतके शेकेल भरणे शक्य नसेल, तर ज्याचे समर्पण होत आहे त्याला याजकापुढे उभे करावे. मग नवस फेडण्यासाठी याजक ठरवेल तितके शेकेल त्याने द्यावे.
९
“ ‘जर त्याने एखादा पशू याहवेहला अर्पण करण्याचा नवस केला असेल, तर हे अर्पण याहवेहला पवित्र असे होईल.
१०
त्यांनी त्याची अदलाबदल करू नये किंवा वाईटाच्या बदल्यात चांगला किंवा चांगल्याच्या बदल्यात वाईट असे करू नये; जर ते एका पशूबद्दल दुसरा पशू अशी अदलाबदल करतील, तर दोन्ही पशू आणि बदललेला पशू पवित्र होतील.
११
जर नवस दिलेला पशू विधिनियमानुसार अशुद्ध असेल—जे याहवेहला अर्पण करण्यास योग्य नाही—तर त्या पशूला याजकाकडे घेऊन यावे.
१२
तो त्याचा दर्जा चांगला किंवा वाईट हे ठरवेल. मग याजक त्याचे जे काही मूल्य ठरवेल, तेवढेच त्याचे मूल्य असेल.
१३
परंतु जर त्या मालकाला तो पशू सोडवून घ्यावयाचा असेल, तर त्याच्या किमतीचा पाचवा भाग अधिक द्यावा.
१४
“ ‘जर एखाद्याने याहवेहला आपले घर पवित्र म्हणून समर्पित केले आणि नंतर त्याची इच्छा असेल की, ते सोडवून घ्यावे, तर याजक त्या घराची चांगलीवाईट स्थिती पाहून त्याचे मूल्य ठरवेल, आणि घरमालक याजकाने ठरविलेली किंमत अधिक वीस टक्के भरून ते घर आपल्या ताब्यात घेईल.
१६
“ ‘जर कोणी त्यांच्या वतनाच्या शेताचा काही भाग याहवेहला समर्पित करीत असतील तर त्या शेतामध्ये किती बी पेरले जाऊ शकेल त्याप्रमाणे त्या शेताची किंमत ठरविली जाईल, एक होमेर जव पेरता येईल तेवढ्या भागाचे मूल्य चांदीचे पन्नास शेकेल होतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options