मुख्य मजकुरावर जा
लेवीय २७:१६-२५

अर्पण केलेल्या शेतांचे मूल्यांकन

लेवीय २७:१६-२५
१६
“ ‘जर कोणी त्यांच्या वतनाच्या शेताचा काही भाग याहवेहला समर्पित करीत असतील तर त्या शेतामध्ये किती बी पेरले जाऊ शकेल त्याप्रमाणे त्या शेताची किंमत ठरविली जाईल, एक होमेर जव पेरता येईल तेवढ्या भागाचे मूल्य चांदीचे पन्नास शेकेल होतील.
१७
जर योबेल वर्षापासून त्याने आपले शेत समर्पित केले तर त्याची ठरविलेली किंमत तितकीच राहील.
१८
तरी, त्याने योबेल वर्षानंतर जर आपले शेत अर्पण केले असेल, तर दुसर्‍या योबेल वर्षाला जितकी वर्षे असतील त्या मानाने याजकाने त्या शेताचे मोल कमी करून मूल्य ठरवावे.
१९
जर शेत समर्पित करणार्‍याला ते सोडवून घ्यावयाचे असेल तर त्यांनी त्याच्या मूल्यात पाचवा भाग जोडला पाहिजे आणि ते शेत पुन्हा त्यांचे होईल.
२०
तथापि, जर त्यांनी ते शेत परत सोडवून न घेता, किंवा त्यांनी ते इतर कोणाला विकले असेल, तर ते कधीही सोडविले जाऊ शकत नाही.
२१
जर ते शेत योबेल वर्षी सोडविले जाते तर ते याहवेहसाठी समर्पित पवित्र शेत मानले जाईल; ते याजकाचे वतन होईल.
२२
“ ‘एखाद्याने स्वतःचे वतन नसलेले, पण दुसर्‍याकडून विकत घेतलेले शेत याहवेहला समर्पित केले, जी त्याच्या कुटुंबाची संपत्ती नसेल,
२३
तर याजक योबेल वर्षापर्यंतची त्या शेताची किंमत ठरवेल, आणि त्याने त्याच दिवशी याजकाने ठरविलेले मूल्य याहवेहसाठी पवित्र समजून द्यावे.
२४
योबेल वर्षी, ज्याच्याकडून शेत विकत घेतले आहे त्या व्यक्तीकडे, म्हणजेच त्या शेताचे खरे वतन असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात परत जावे.
२५
तुम्ही विकता त्या प्रत्येकाचे मूल्य पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार असावे आणि एक शेकेल म्हणजे वीस गेरा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options