Skip to content
लेवीय १३:५०-५९

लेवीय १३:५०-५९

५०
याजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.
५२
तेव्हा याजकाने ती वस्त्रे, ते कापड किंवा ती विणलेली लोकरीची वा चामड्याची वस्तू संसर्गजन्य आहे असे म्हणून अग्नीत जाळून टाकावी.
५३
पण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी.
५५
मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो पसरला नाही. तरी तो अशुद्ध आहे असे समजावे; ती वस्तू जाळून टाकावी कारण तिला आतून, बाहेरून, सगळीकडून कुष्ठरोगाचा संसर्ग पोहोचला आहे असे समजावे.
५६
पण धुतल्यानंतर चट्ट्याचा रंग फिकट झाला आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने चट्टा असलेल्या विणलेल्या कापडाच्या वा चामड्याच्या वस्तूचा तेवढाच भाग कापून टाकावा.
५७
इतके करूनही जर तो चट्टा या विणलेल्या वस्त्रावर किंवा चामड्याच्या वस्तूवर पुन्हा फुलून निघाला, तर याजकाने ती वस्तू अवश्य जाळून टाकावी, कारण तिला कुष्ठरोग आहे.
५८
पण ती विणलेल्या कापडाची किंवा चामड्याची वस्तू धुतल्यानंतर तिच्यावरील चट्टा नाहीसा झाला, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल.
५९
लोकरीच्या व तागमिश्रित सुताच्या विणलेल्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला, चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options