Skip to content
लेवीय १३:१८-२८

लेवीय १३:१८-२८

१८
ज्या माणसाच्या त्वचेवर फोड येऊन पुढे तो फोड बरा झाला
१९
व फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे.
२०
याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर तो चट्टा त्वचेखाली खोलवर गेला असेल आणि त्याच्यावरील केस पांढरे झाले असतील, तर याजकाने त्याला अशुद्ध म्हणून जाहीर करावे; कारण फोडामधून कुष्ठरोग निर्माण झाला आहे.
२१
पण तपासणीनंतर त्या चट्ट्यामध्ये पांढरे केस नाहीत आणि चट्टा त्वचेत खोल गेला नाही व त्याचा रंग करडा आहे, असे याजकाला दिसून आले असेल, तर याजकाने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
२२
त्या कालावधीत तो चट्टा पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो गंभीर आजार आहे.
२३
पण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे.
२४
एखादा काही कारणाने भाजला व जळालेली जागा लालसर पांढरी किंवा नुसती पांढरी झाली असे दिसून आले,
२५
तर याजकाने तो चट्टा अवश्य तपासावा. जर चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील, आणि तो त्वचेपेक्षा खोल गेला आहे असे दिसून आले, तर त्या जळालेल्या भागी कुष्ठरोग फुटला असे समजावे; याजकाने त्यास अशुद्ध जाहीर करावे; तो मनुष्य कुष्ठरोगी आहे.
२६
पण तपासणीनंतर त्या पांढर्‍या चट्ट्यावरील केस पांढरे झालेले नाहीत, आणि पांढरेपणा त्वचेच्या खोलवर गेलेला नाही व तो हळूहळू कमी होत आहे, असे जर याजकाला दिसून आले, तर याजकाने त्याला सात दिवसापर्यंत वेगळे ठेवावे;
२७
सातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.
२८
पण पांढरा चट्टा त्वचेवर पांगून परसला नाही आणि तो हळूहळू कमी होत आहे, असे दिसून आले, तर याजकाने त्याला शुद्ध जाहीर करावे; तो जळालेल्या जागेत केवळ व्रण आहे आणि त्याला कुष्ठरोग नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options