Skip to content
विलापगीत ४:१६-२२

विलापगीत ४:१६-२२

१६
स्वतः याहवेहने त्यांची पांगापांग केली आहे; ते आता त्यांचा सांभाळ करणार नाहीत. याजक सन्मानयोग्य राहिले नाहीत, वडीलजन कृपेयोग्य राहिले नाहीत.
१७
शिवाय, मदतगार शोधून आमची दृष्टी मंद झाली आहे; जे आमच्या मदतीसाठी येणार नाहीत अशा राष्ट्रांवर आमच्या बुरुजांवरून आम्ही लक्ष ठेवले.
१८
आम्हाला बाहेर रस्त्यांवर चालता येत नाही, कारण लोक प्रत्येक पावलावर आमचा पाठलाग करतात. आमचा अंत जवळ आला आहे, आणि आमचे मोजकेच दिवस राहिले आहेत. आमचा अंत आलेलाच आहे.
१९
आमचा पाठलाग करणारे आकाशातील गरुडांपेक्षा वेगवान आहेत; ते पर्वतांवरही आम्हाला शोधून काढतात आणि वाळवंटात आमची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात.
२०
याहवेह द्वारा अभिषिक्त, आमच्या जीवनाचा श्वास, त्यांच्या जाळ्यात अडकला. आम्ही विचार केला होता की त्यांच्या छत्राखाली कोणत्याही परकीय राष्ट्रात आम्ही रहिवास करू.
२१
ऊस प्रांतात राहणार्‍या एदोम कन्ये, हर्ष कर व उल्हासित हो. परंतु तुझ्याकडे देखील तो प्याला आणल्या जाईल; तू तो पिऊन मदोन्मत्त होऊन पूर्णतः निर्वस्त्र होशील.
२२
सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल, ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत. पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील, आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options