मुख्य मजकुरावर जा
विलापगीत १:१८-२२

कबुली आणि न्यायासाठी प्रार्थना

विलापगीत १:१८-२२
१८
“याहवेह नीतिमान आहेत, तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; माझ्या वेदना पाहा. कारण माझे तरुण व तरुणी बंदिवासात गेले आहेत.
१९
“मी माझ्या मित्रगणांना बोलाविले पण त्यांनी माझा विश्वासघात केला. माझे याजक आणि वडीलजन स्वतःस जिवंत ठेवण्यासाठी जेव्हा ते अन्नाचा शोध घेत होते तेव्हा ते नगरात नष्ट झाले.
२०
“हे याहवेह, माझ्या वेदना पाहा! माझे अंतःकरण यातनाग्रस्त झाले आहे, आणि माझे हृदय अस्वस्थ झाले आहे. कारण मी अत्यंत बंडखोर झाले होते. बाहेर तलवार मला मृत्यू आणते; आत तर केवळ मरणच आहे.
२१
“लोकांनी माझे कण्हणे ऐकले आहे, पण माझे सांत्वन करण्यास कोणीही नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझ्या संकटांबद्दल ऐकले आहे तुम्ही जे केले ते पाहून त्यांना आनंद झाला आहे; तुम्ही घोषणा केलेला दिवस येवो म्हणजे ते देखील माझ्यासारखेच होतील.
२२
“त्यांची सर्व दुष्कृत्ये तुमच्यापुढे येवोत; माझ्या सर्व पापांमुळे तुम्ही माझ्याशी जसा व्यवहार केला तसाच त्यांच्याशीही करा. माझे उसासे खूप आहेत व माझे हृदय मूर्छित झाले आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options