मुख्य मजकुरावर जा
विलापगीत १:१२-१७

यरुशलेम जगाला संबोधते

विलापगीत १:१२-१७
१२
या वाटेच्या वाटसरूंनो माझी दुर्दशा पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय? मला जे दुःख देण्यात आले आहे, त्या माझ्या दुःखासारखे दुसरे दुःख आहे काय? याहवेहने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी ही वेदना माझ्यावर लादली आहे.
१३
त्यांनी उच्च स्थानातून अग्नी पाठविला आहे व तो माझ्या हाडांमध्ये जळत आहे. त्यांनी माझ्या पावलात सापळा पसरविला आहे व मला मागे वळविले आहे. त्यांनी मला उद्ध्वस्त केले आहे, मी दिवसभर मूर्छित होत आहे.
१४
माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत; त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. मी ज्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्या हाती मला दिले आहे.
१५
“माझ्यामध्ये असलेल्या सर्व योद्ध्यांना प्रभूने नाकारले आहे; माझ्या तरुणांना चिरडून टाकण्यासाठी प्रभूंनी एका मोठ्या सैन्यास हजर राहण्यास फर्माविले आहे. त्यांच्या द्राक्षकुंडात प्रभूंनी कुमारी कन्या यहूदीयास तुडविले आहे.
१६
“याकारणास्तव मी रडत आहे आणि माझ्या डोळ्यातून अश्रुपात होत आहे. माझे सांत्वन करण्यास माझ्याजवळ कोणीही नाही, माझा आत्मा पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणीही नाही. माझी मुलेबाळे निराश्रित झाली आहेत. कारण शत्रूचे वर्चस्व झाले आहे.”
१७
सीयोन हात पसरीत आहे, पण तिचे सांत्वन करण्यास कोणीही नाही. कारण याहवेहने याकोबाविषयी फर्मान काढले आहे तिचे शेजारीच तिचे शत्रू होवोत; तिच्या शेजाऱ्यामध्ये यरुशलेम अमंगळ वस्तूसारखी झाली आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options