Skip to content
विलापगीत १:८-११

कारण: पाप आणि लज्जा

विलापगीत १:८-११
कारण यरुशलेमेने भयंकर पापे केली म्हणूनच ती किळसवाणी झाली आहे. तिचा मान सन्मान करणारे आता तिला तुच्छ मानतात, कारण तिला विवस्त्र असे त्यांनी पाहिले आहे; ती कण्हते व वळून निघून जाते.
तिची अशुद्धता तिच्या वस्त्राला चिकटली आहे; तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही. तिचे पतन अचंबित करून सोडणारे होते; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे याहवेह, माझी दुर्दशा पाहा, शत्रू विजयी झाला आहे.”
१०
तिच्या सर्व संपत्तीवर तिच्या शत्रूंनी हात टाकला आहे. परकीय राष्ट्रांनी तिच्या पवित्र मंदिरात प्रवेश करताना तिने बघितले होते— तुम्ही निषिद्ध केलेल्यांनी तुमच्या सभास्थानात प्रवेश केला.
११
अन्नाचा शोध घेत असताना तिचे लोक कण्हत आहेत; मौल्यवान वस्तूच्या मोबदल्यात ते अन्न विकत घेत आहेत जेणेकरून ते जिवंत राहतील. “हे याहवेह, पाहा आणि याकडे लक्ष द्या, मी कशी घृणास्पद झाले आहे.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options