शास्ते ९:२३-३०
२३
परमेश्वराने अबीमेलेख व शेखेमाच्या नागरिकांमध्ये वैर निर्माण केले, ज्यामुळे त्यांनी अबीमेलेखाचा विश्वासघात केला.
२४
यरूब्बआलाच्या सत्तर पुत्रांचा विरोधात केलेल्या अपराधाचा, त्यांचा रक्तपात करण्याचा, त्यांचा भाऊ अबीमेलेख आणि शेखेमाच्या नागरिकांवर ज्यांनी अबीमेलेखाचा त्याच्या बंधूंची हत्या करण्यास साहाय्य केले होते, त्यांचा सूड घेण्यास परमेश्वराने असे केले.
२५
शेखेमाच्या नागरिकांनी त्याच्याविरुद्ध डोंगराच्या माथ्यावर वाटेवर दबा धरण्यास लोक ठेवले आणि त्या वाटेने जाणार्या येणार्या प्रत्येकाला ते लुबाडू लागले आणि हे कोणीतरी अबीमेलेखाचा सांगितले.
२६
मग एबेदचा पुत्र गाल आपल्या भावांबरोबर शेखेमास आला आणि तेथील नागरिकांनी त्याच्यावर भरवसा ठेवला.
२७
नंतर ते शेतात गेले आणि द्राक्षे गोळा केली आणि ती तुडविली व त्यांच्या दैवताच्या मंदिरात उत्सव केला. ते खातपीत असताना त्यांनी अबीमेलेखाला शाप दिला.
२८
नंतर एबेदचा पुत्र गाल म्हणाला, “अबीमेलेख कोण आहे आणि आम्ही शेखेमी लोकांनी त्याची चाकरी का करावी? तो यरूब्बआलाचा पुत्र नाही का आणि त्याचा कारभारी जबुल नाही का? शेखेमचा पिता हमोरच्या कुटुंबाची तुम्ही सेवा करा! अबीमेलेखाच्या कुटुंबाची आम्ही सेवा का करावी?
२९
जर हे लोक माझ्या अधिकारात असते तर किती बरे झाले असते! तेव्हाच मी अबीमेलेखाला काढून टाकले असते. मी अबीमेलेखाला म्हणेन, ‘तुझे संपूर्ण सैन्य घेऊन बाहेर पड आणि लढाई कर!’ ”
३०
परंतु नगराधिपती जबुलाने एबेदचा पुत्र गालचे बोलणे ऐकले तेव्हा तो भयंकर संतापला.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings