Skip to content
शास्ते २०:३५-४८

शास्ते २०:३५-४८

३५
तेव्हा याहवेहने बिन्यामीनांचा इस्राएलपुढे पराभव केला आणि त्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनातील पंचवीस हजार शंभर लोक ठार केले, हे सर्व तलवारीने सशस्त्र होते.
३६
तेव्हा बिन्यामीन लोकांनी पाहिले की त्यांच्या पराभव झाला आहे. इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांपुढून बाजूला झाले, कारण त्यांचा गिबियाहजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर भरवसा होता.
३७
जे दबा धरून बसलेले होते त्यांनी अचानक गिबियाहवर हल्ला केला आणि ते शहरात पसरले आणि पूर्ण शहराचा तलवारीने नाश केला.
३८
इस्राएली लोक आणि दबा धरून बसलेले यांच्यात अशी सांकेतिक खूण ठरली होती की शहरातून धुराचा मोठा लोट वर चढेल असे करावे,
३९
आणि मग इस्राएली लोक पलटवार करतील. बिन्यामीन लोकांनी इस्राएली पुरुष (सुमारे तीस) ठार केले आणि ते म्हणाले, “आपण त्यांचा पहिल्या युद्धाप्रमाणेच पराभव करीत आहोत.”
४०
परंतु जेव्हा शहरातून धुराचा लोट वर चढू लागला, तेव्हा बिन्यामीन लोकांनी मागे वळून पाहिले आणि संपूर्ण शहरातून धुराचा लोट वर आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले.
४१
नंतर इस्राएली लोकांनी पलटवार केला आणि बिन्यामीन लोक घाबरून गेले आणि त्यांना कळून आले की त्यांच्यावर भयंकर संकट आले आहे.
४२
म्हणून ते इस्राएली लोकांपुढून रानाकडे पळू लागले, परंतु युद्धापासून वाचू शकले नाही. आणि इस्राएली लोकांनी ते ज्या नगरातून निघाले होते त्यांना तिथेच ठार मारले.
४३
त्यांनी बिन्यामीन लोकांचा पाठलाग करीत गिबियाहच्या पूर्वेस त्यांना वेढले आणि त्यांना सहज तुडविले.
४४
बिन्यामीन लोकांचे अठरा हजार लोक ठार झाले, ते सर्व वीर योद्धे होते.
४५
जसे ते मागे वळले आणि रानात रिम्मोनाच्या खडकाकडे पळाले, परंतु इस्राएली लोकांनी वाटेतच त्यांच्यापैकी पाच हजार पुरुषांना ठार केले आणि पुढे बिन्यामीन लोकांचा गिदोमापर्यंत पाठलाग करून त्यांचे आणखी पुरुष दोन हजार पुरुष मारून टाकले.
४६
त्या दिवशी बिन्यामीनचे पंचवीस हजार तलवारधारक मारले गेले, जे सर्व वीर योद्धे होते.
४७
पण त्यापैकी सहाशे पुरुष वळले आणि रानात रिम्मोन खडकावर पळून गेले आणि तिथे ते चार महिने राहिले.
४८
मग इस्राएली पुरुष परत बिन्यामीन लोकांकडे गेले आणि त्यांनी संपूर्ण नगर व पशू आणि त्यांना जे मिळाले त्या सर्वांना तलवारीने मारले. जी नगरे त्यांना आढळली त्या सर्वांना त्यांनी जाळून भस्मसात केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options