Skip to content
शास्ते १९:१०-१४

शास्ते १९:१०-१४

१०
परंतु आणखी एक रात्र थांबण्यास तयार झाला नाही, तो पुरुष निघाला आणि आपली उपपत्नी व त्याचे खोगीर घातलेले दोन गाढव घेऊन यबूस (म्हणजे यरुशलेम आहे) येथे निघाले.
११
जेव्हा ते यबूस जवळ होते आणि दिवस उतरला होता, तेव्हा तो सेवक आपल्या धन्यास म्हणाला, “चला आपण या यबूसी लोकांच्या शहरात थांबू आणि रात्र घालवू.”
१२
त्याच्या धनी म्हणाला, “नाही, आपण अशा कोणत्याही शहरात जाणार नाही जेथील लोक इस्राएली नाहीत. आपण गिबियाहपर्यंत जाऊ.”
१३
तो आणखी म्हणाला, “चला आपण गिबियाह किंवा रामाहपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि यापैकी एका ठिकाणी मुक्काम करू.”
१४
तेव्हा ते प्रवास करीत पुढे निघाले आणि सूर्य मावळत असता ते बिन्यामीनच्या गिबियाहजवळ पोहोचले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options