Skip to content
शास्ते १८:८-१३

शास्ते १८:८-१३

८
जेव्हा ते हेर सोराह व एष्टाओल येथे परतले, त्यांच्या दान भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्ही काय माहिती आणली आहे?”
९
त्यांनी उत्तर दिले, “चला, आपण त्यांच्यावर हल्ला करू! आम्ही तो देश पाहिला आहे आणि तो खूप चांगला आहे. तुम्ही काही करणार नाही का? तिथे जाऊन ते ताब्यात घेण्यास अजिबात संकोच करू नका.
१०
जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल, तेव्हा तुम्हाला एक संशयहीन लोक आणि परमेश्वराने तुमच्या हातात दिलेली सुरक्षित प्रशस्त भूमी सापडेल, अशी भूमी जिथे कशाचीही कमतरता नाही.”
११
तेव्हा दान गोत्राचे सहाशे सैनिक सोराह व एष्टाओल येथून निघाले.
१२
त्यांनी जाताना यहूदीयातील किर्याथ-यआरीम जवळ तळ दिला, यामुळे या ठिकाणाला आज देखील “महाने-दान” असेच म्हणतात.
१३
तिथून ते एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाहच्या घरी आले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.