शास्ते १८:२२-२६
२२
जेव्हा ते मीखाहच्या घरापासून काही दूर गेले असता, मीखाहचे शेजारी एकत्र आले आणि त्यांनी दानच्या लोकांना गाठले.
२३
जेव्हा त्यांनी दानच्या लोकांना हाक मारली तेव्हा ते वळले आणि मीखाहला विचारले, “तुला काय झाले आहे की तू आपल्या लोकांना युद्ध करण्यास घेऊन आला आहेस?”
२४
मीखाहने प्रत्युत्तर दिले, “जे दैवत मी तयार केले त्यांना आणि माझ्या पुरोहिताला तुम्ही घेऊन जात आहात आणि उलट तुम्हीच मला विचारता? मला काय हवे आहे. ‘आता माझ्याजवळ काहीही राहिलेले नाही?’ ”
२५
त्यावर दानच्या लोकांनी उत्तर दिले, “आमच्यासोबत वाद घालू नकोस, नाहीतर काही माणसांना राग येईल आणि ते तुझ्यावर हल्ला करतील आणि तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना आपला जीव गमवावा लागेल.”
२६
मग दानचे लोक आपल्या मार्गाने गेले आणि मीखाहने पाहिले ते लोक फार शक्तिशाली आहेत, तेव्हा तो माघारी फिरला आणि आपल्या घरी गेला.
Settings