शास्ते १६:२३-२७
२३
आता पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांचे दैवत दागोनला यज्ञ अर्पण करून उत्सव करण्यास एकत्र आले आणि म्हणाले, “आमच्या दैवताने आमचा शत्रू शमशोनला आमच्या हाती दिले आहे.”
२४
जेव्हा त्यांनी शमशोनला पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या दैवताची स्तुती करीत ते म्हणाले, “आमच्या दैवताने आमच्या शत्रूला आमच्या हाती दिले आहे, जो आमच्या देशाची गांजणूक करणारा व आमच्या लोकांतील अनेकांचा संहार करणारा होता.”
२५
जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली. जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले,
२६
तेव्हा ज्या सेवकाने त्याचा हात धरला होता त्यास शमशोन म्हणाला, “मला अशा ठिकाणी ठेव जेणेकरून ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मी चाचपडू शकेन, म्हणजे मी त्याचावर टेकेन.”
२७
आता ते मंदिर पूर्णपणे पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते; पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तिथे होते आणि गच्चीवर सुमारे तीन हजार पुरुष आणि स्त्रिया शमशोन करीत असलेली करमणूक पाहत होते.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings