मुख्य मजकुरावर जा
यहोशुआ ६:२२-२५

रहाब व तिचे कुटुंब वाचते

यहोशुआ ६:२२-२५
२२
ज्यांनी तो देश हेरला होता त्या दोन हेरांना यहोशुआ म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्याबरोबर असलेल्या तिच्या नातेवाईकांना तुम्ही वचन दिल्याप्रमाणे बाहेर काढा.”
२३
तेव्हा ज्या तरुण पुरुषांनी तो देश हेरला होता, ते आत गेले आणि त्यांनी राहाब, तिचे वडील आणि आई, तिचे भाऊ आणि बहिणी आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना बाहेर काढले. त्यांनी तिच्या संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढले आणि इस्राएलच्या छावणीबाहेरील जागेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली.
२४
इस्राएली लोकांनी ते शहर व त्यातील प्रत्येक गोष्ट जाळून टाकली. फक्त चांदी व सोने, कास्य व लोखंडाची पात्रे याहवेहच्या भांडारासाठी राखून ठेवण्यात आली.
२५
परंतु यहोशुआने राहाब वेश्येस आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना वाचविले, कारण यहोशुआने यरीहोत पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते आणि इस्राएली लोकांमध्ये ते आजपर्यंत राहत आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options