मुख्य मजकुरावर जा
यहोशुआ ६:१-५

देव यरीहोला वेढा घालण्याची आज्ञा देतो

यहोशुआ ६:१-५
इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही.
तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “पाहा, मी यरीहो शहर, त्याचबरोबर त्यांचा राजा आणि त्यांचे योद्धे पुरुष देखील तुझ्या हाती दिले आहे.
सर्व सशस्त्र माणसांना घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घाला. सहा दिवस असेच करा.
मेंढ्याच्या शिंगापासून केलेली रणशिंगे घेऊन सात याजक कोशाच्या पुढे ठेवा. सातव्या दिवशी याजक रणशिंगे वाजवित शहराभोवती सात वेळेस प्रदक्षिणा घालतील.
जेव्हा त्यांच्या रणशिंगाचा मोठा व दीर्घ आवाज तुम्ही ऐकाल, त्यावेळी संपूर्ण सैन्याने मोठा जयघोष करावा. तेव्हा शहराचा तट कोसळेल आणि सैन्य पुढे जाईल, नंतर प्रत्येकजण सरळ आत प्रवेश करेल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options