मुख्य मजकुरावर जा
यहोशुआ ३:७-१३

देव यहोशवाचा अधिकार वाढवतो

यहोशुआ ३:७-१३
मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे.
कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ”
मग यहोशुआने इस्राएली लोकांस म्हटले, “इकडे या व याहवेह तुमच्या परमेश्वराचे शब्द ऐका.
१०
यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील.
११
पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल.
१२
तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा.
१३
याहवेह अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांचे पाय यार्देनला लागताच, वरून वाहत येणारे पाणी थांबेल व त्याची रास उभी राहील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options