Skip to content
योहान १२:४४-५०

येशूची शेवटची सार्वजनिक साक्ष

योहान १२:४४-५०
४४
नंतर येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी मजवर विश्वास ठेवतात ते फक्त मजवरच विश्वास ठेवतात असे नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर ठेवतात;
४५
जे मला पाहतात ते वास्तविक ज्यांनी मला पाठविले त्यांनाच पाहतात.
४६
मी या जगात प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जे मजवर विश्वास ठेवतात त्यांनी अंधारात राहू नये.
४७
“जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तीचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.
४८
जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारे एकच आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील.
४९
कारण मी माझे स्वतःचे बोलत नाही, ज्या पित्याने मला पाठविले, त्यांनी मी काय सांगावे व काय बोलावे याची मला आज्ञा दिली आहे.
५०
त्यांच्या आज्ञा सार्वकालिक जीवनाकडे नेणार्‍या आहेत. यास्तव जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options