Skip to content
इय्योब ९:१६-२३

इय्योब ९:१६-२३

१६
मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता; तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही.
१७
वादळाने ते मला चेंगरून टाकतात आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात.
१८
ते मला श्वास घेऊ देत नाहीत, परंतु मला क्लेशांनी त्रस्त करतात.
१९
जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत! आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल?
२०
मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल.
२१
“मी जरी निर्दोष असलो, मला स्वतःबद्दल चिंता नाही; मी स्वतः माझे जीवन तुच्छ मानतो.
२२
हे सर्व समानच आहे म्हणून मी म्हणतो, ‘निर्दोषी आणि दोषी या दोघांचाही ते नाश करतात.’
२३
जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते, निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options