१३
जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो; देवहीन मनुष्याची आशा नष्ट होते.
१४
ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते, ज्यावर ते अवलंबून राहतात ते मकडीच्या जाळासारखे आहे.
१५
ते जाळ्यावर विसंबून राहतील, परंतु ते टिकून राहवयाचे नाही; ते त्याला बिलगतील, परंतु ते मजबूत राहत नाहीत.