मुख्य मजकुरावर जा
इय्योब ८:१-७

बिल्दद ईयोबवर आरोप करतो व देवाच्या न्यायाचे समर्थन करतो

इय्योब ८:१-७
तेव्हा बिल्दद शूहीने उत्तर दिले,
“कुठवर अशा गोष्टी तू बोलत राहशील? सोसाट्याच्या वार्‍यासारखे तुझे शब्द आहेत.
परमेश्वर न्याय विपरीत करतात काय? सर्वसमर्थ जे योग्य आहे त्याचा विपर्यास करतात काय?
जेव्हा तुझ्या मुलांनी त्यांच्याविरुद्ध पाप केले, म्हणून परमेश्वराने त्यांच्या पापाची त्यांना शिक्षा केली.
परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील,
जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्‍दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील.
तुझा प्रारंभ लीन असला, तरी तुझे भावी आयुष्य समृद्धीचे होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options