Skip to content
इय्योब ४०:५

इय्योब ४०:५

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ५ दाखवत आहे.
२
“जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का? जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!”
३
तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला:
४
“मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.
५
मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”
६
मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले:
७
“पुरुषासारखी आपली कंबर कस; मी तुला प्रश्न विचारतो, आणि तू मला त्याचे उत्तर देशील.
८
“माझ्या न्याया विषयी तू संशय धरशील काय? स्वतःचे समर्थन करावे म्हणून तू मला दोष लावशील काय?

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.