Skip to content
इय्योब ४०:१-५

इय्योब ४०:१-५

याहवेहने इय्योबास पुढे म्हटले,
“जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का? जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!”
तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला:
“मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.
मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options