Skip to content
इय्योब ३७:१४-२०

निर्मितीविषयी ईयोबच्या ज्ञानाला आव्हान

इय्योब ३७:१४-२०
१४
“हे इय्योबा, लक्षपूर्वक ऐक; थांब आणि परमेश्वराची आश्चर्यकर्मे समजून घे.
१५
परमेश्वर मेघांवर कसे नियंत्रण करतात आणि त्यांची वीज कशी चमकवितात हे तुला माहीत आहे का?
१६
मेघ शांत कसे होतात हे तुला माहीत आहे का त्यांच्या त्या अद्भुत कृत्यांचे परिपूर्ण ज्ञान कोणाला आहे?
१७
जेव्हा तुझ्या वस्त्रांमध्ये तुला घाम फुटतो आणि दक्षिणेच्या वार्‍यामुळे भूमी स्तब्ध होते,
१८
आकाश जे साच्यात असलेल्या कास्य आरशाप्रमाणे आहे, ते परमेश्वराबरोबर तू पसरवशील काय?
१९
“आपण त्यांच्याशी काय बोलावे ते आम्हाला सांग; आपल्या अंधकारामुळे आपला वाद आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही.
२०
मला बोलायचे आहे असे त्यांना सांगावे काय? आपणास गिळून टाकावे म्हणून कोणी विचारतील काय?

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.