मुख्य मजकुरावर जा
इय्योब ३७:१-५

अलीहू देवाच्या भयप्रद सामर्थ्याची कबुली देतो

इय्योब ३७:१-५
“हे ऐकून माझे हृदय धडधडते ते आपल्याच ठिकाणी झेप घेते.
ऐका! परमेश्वराच्या डरकाळीचा आवाज ऐका, ती गर्जना जी त्यांच्या मुखातून येते.
संपूर्ण आकाशाच्या खालून ते लखलखीत वीज मोकळी सोडतात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवितात.
त्यानंतर त्यांच्या डरकाळीचा आवाज येतो; त्यांच्या राजेशाही आवाजात ते गडगडतात. जेव्हा त्यांचा आवाज सगळीकडे घुमतो, तेव्हा ते काहीही मागे धरून ठेवीत नाहीत.
परमेश्वराची वाणी आश्चर्यकारकरित्या गर्जना करते; आमच्या बुद्धीपलीकडील महान कार्य ते करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options