मुख्य मजकुरावर जा
इय्योब ३६:५-१५

देवाचे सामर्थ्य व निष्पक्ष न्याय

इय्योब ३६:५-१५
“परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही; ते बलवान असून त्यांच्या योजनांमध्ये स्थिर आहेत.
दुष्टांना ते जिवंत ठेवत नाही परंतु पीडितांना त्यांचे हक्क देतात.
न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही; राजांबरोबर त्यांना ते राजासनावर बसवितात आणि सर्वकाळासाठी त्यांना थोर बनवितात.
परंतु जर लोक साखळ्यांनी बांधलेले आहेत, आणि दुःखाच्या दोरखंडात जखडलेले आहेत,
त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात— त्यांनी गर्विष्ठपणात पाप केले आहे.
१०
ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात आणि त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची आज्ञा करतात.
११
जर त्यांनी आज्ञा पाळल्या आणि परमेश्वराची सेवा केली, तर त्यांच्या आयुष्याचे बाकीचे दिवस ते समृद्धीत घालवतील आणि संतृप्तीची वर्षे बघतील.
१२
परंतु जर ते ऐकणार नाहीत, तर तलवारीने ते नाश होतील आणि ज्ञाना अभावी मरण पावतील.
१३
“देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात; त्यांना बेड्या बांधल्या, तरी ते मदतीसाठी रडत नाही.
१४
त्यांच्या भर तारुण्यातच मंदिरांना जीवन समर्पित असलेल्या पुरुषगामींसह ते मरण पावतात.
१५
परंतु जे क्लेश सहन करतात त्यांना परमेश्वर क्लेशातून मुक्त करतात; त्यांच्या दुःखात ते त्यांच्याशी बोलतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options