इय्योब ३६:१-४
१
एलीहू पुढे म्हणाला:
२
“अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन की परमेश्वराच्या बाजूने मला आणखी पुष्कळ बोलायचे आहे.
३
माझे ज्ञान मला फार दुरून मिळते; माझ्या निर्माणकर्त्याचे न्यायीपण मी वर्णन करून सांगेन.
४
ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत; ज्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे तो तुझ्याबरोबर आहे.
Settings