Skip to content
इय्योब ३६:२४-३३

इय्योब ३६:२४-३३

२४
ज्या कृत्यांबद्दल लोकांनी गीते गाऊन स्तुती केली, ती त्यांची कृत्ये आठवून त्यांची प्रशंसा कर.
२५
सर्व मानवजातीने हे पाहिले आहे; मनुष्य दुरूनच त्याच्याकडे टक लावून पाहतात.
२६
परमेश्वर किती महान आहे—ते समजणे आमच्या बुद्धीपलीकडे आहे! त्यांच्या आयुष्याच्या संख्येचे आकलन करता येत नाही.
२७
“ते पाण्याचे थेंब वर आकर्षून घेतात, आणि झर्‍यासाठी त्याचे रूपांतर पावसात करतात;
२८
मेघ आपले दहिवर खाली ओततात आणि मनुष्यांवर भरपूर वृष्टी होते.
२९
ढगांना त्यांनी कसे पसरविले आहे, आपल्या मंडपातून ते कसे गडगडाट करतात हे कोणाला समजते?
३०
पाहा ते कशाप्रकारे आपल्या सभोवती वीज विखरून ठेवतात, आणि समुद्राच्या खोलीला झाकून घेतात.
३१
अशाप्रकारे परमेश्वर राष्ट्रांवर अधिकार करतात आणि विपुलतेने अन्न पुरवितात.
३२
चमकणार्‍या विजेला ते आपल्या हातात भरतात आणि त्याच्या नेमाने तडाखा करण्यास आज्ञा करतात.
३३
त्यांचा गडगडाट येणार्‍या वादळाची घोषणा करते; पशूप्राण्यांना सुद्धा त्यांच्या येण्याचे पूर्वज्ञान होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options