Skip to content
इय्योब ३३:१-७

इय्योब ३३:१-७

“परंतु आता हे इय्योबा, माझे शब्द ऐक; मी जे बोलणार आहे त्या सर्वाकडे लक्ष दे.
मी बोलायला माझे मुख उघडत आहे; माझे शब्द माझ्या जिभेच्या टोकावर आहेत.
माझे शब्द सरळ हृदयातून येतात; माझे ओठ जे मला माहीत आहे तेच खरेपणाने बोलतील.
परमेश्वराच्या आत्म्याने मला घडविले आहे; आणि सर्वसमर्थाचा श्वास मला जीवन देतो.
तुला उत्तर देता येत असेल, तर मला उत्तर दे; ऊठ आणि तुझा खटला माझ्यासमोर चालव.
परमेश्वरासमोर जसा तू, तसा मीही आहे; मी सुद्धा मातीचा घडविलेला आहे.
माझे भय बाळगण्याची तुला गरज नाही, किंवा माझा हात तुझ्यावर भारी नसो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options