Skip to content
इय्योब ३२:१५-२२

इय्योब ३२:१५-२२

१५
“ते निराश झाले आहेत आणि त्यांच्याकडे बोलण्यासाठी आणखी काही उरले नाही; ते शब्‍दरहित झाले आहेत.
१६
आता ते तिथे गप्प उभे आहेत, ते शांत आहेत म्हणून ते बोलतील याची मी वाट का पाहावी?
१७
मी देखील माझे म्हणणे सादर करेन; मला जे माहीत आहे ते मी सुध्‍दा सांगेन.
१८
कारण माझ्याकडे भरपूर शब्द आहेत, आणि माझ्या आत माझा आत्मा मला बोलावयास भाग पाडत आहे;
१९
बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या द्राक्षारसा समान, नवीन बुधला जो फुटायला आला आहे, त्यासारखा मी झालो आहे.
२०
मला आराम मिळावा म्हणून मी बोलणारच; उत्तर देण्यासाठी मी माझे मुख उघडलेच पाहिजे.
२१
मी पक्षपात करणार नाही, ना मी कोणा मनुष्याची उगीच प्रशंसा करणार;
२२
कारण मी जर कोणाची फाजील स्तुती करण्यात तरबेज असलो, तर माझा निर्माणकर्ता मला लवकरच घेऊन जाईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options