मुख्य मजकुरावर जा
इय्योब ३२:१-५

मित्र बोलणे थांबवतात

इय्योब ३२:१-५
मग त्या तिघांनी इय्योबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण आपल्या दृष्टीने तो स्वतः नीतिमान होता.
परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता.
तीन मित्रांवर देखील तो संतापला कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे इय्योबाचे खंडन केले नाही आणि तरीसुद्धा त्यांनी परमेश्वराला दोषी ठरविले होते.
एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते.
परंतु जेव्हा एलीहूने पाहिले की आणखी बोलण्यास त्यांच्याजवळ काहीही उरले नाही, त्याचा राग भडकला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options