इय्योब ३०:२५-३१
२५
संकटात असलेल्यांसाठी मी रडलो नाही काय? गरिबांसाठी माझा जीव खिन्न झाला नाही काय?
२६
तरीही मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा केली, पण वाईटच मिळाले; आणि मी प्रकाशाची वाट पाहिली, पण अंधकार आला.
२७
माझ्या आतील व्याकुळतेचे मंथन थांबत नाही; क्लेशाचे दिवस माझ्याशी सामना करतात.
२८
मी काळवंडून जात आहे, पण तो उन्हाने नव्हे; मी सभेत उभा राहून मदतीची याचना करतो.
२९
मी कोल्ह्यांचा भाऊ, आणि घुबडाचा सोबती असा झालो आहे.
३०
माझी त्वचा काळी पडून ती सोलून निघत आहे; माझे शरीर तापाने फणफणत आहे.
३१
माझी वीणा रडण्याचे, आणि माझा पावा शोकाचे स्वर काढते.
Settings