Skip to content
इय्योब २९:१२-१७

इय्योब २९:१२-१७

१२
कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे, त्यांची मी सुटका केली.
१३
मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.
१४
नीतिमत्वाला मी पांघरले होते; न्याय हाच माझा झगा व मुकुट असे.
१५
मी अंधाचे नेत्र आणि पांगळ्यांचे पाय असा होतो.
१६
मी गरजवंतांचा पिता होतो; आणि अनोळखी लोकांच्या वतीने वाद करत असे.
१७
मी दुष्टांचे जबडे फाडून त्यांच्या मुखातून पीडितांना बाहेर ओढून काढले.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.