Skip to content
इय्योब २९:१-६

ईयोब देवाच्या कृपेचे दिवस आठवतो

इय्योब २९:१-६
इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:
“माझे गेलेले महिने, ज्यामध्ये परमेश्वराची नजर माझ्यावर होती, त्या दिवसांची मला खूप आस आहे,
जेव्हा त्यांचा प्रकाशदीप माझ्या मस्तकावर पडत असे मग अंधारातही त्यांच्याच प्रकाशात मी चालत असे!
माझ्या उत्कृष्ट दिवसात, जेव्हा माझे घराणे परमेश्वराच्या जिव्हाळ्याच्या संगतीने आशीर्वादित होते,
जेव्हा सर्वसमर्थाची साथ अजूनही माझ्याबरोबर होती आणि माझी मुलेबाळे माझ्याभोवती होती,
जेव्हा माझी वाट लोण्याने भिजली जात असे आणि खडक माझ्यासाठी जैतुनाच्या तेलाचे झरे ओतून देत असे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options