Skip to content
इय्योब २८:१-११

इय्योब २८:१-११

चांदीसाठी खाण असते आणि सोने शुद्ध करण्याचे एक ठिकाण असते.
लोखंड मातीतून घेतले जाते, आणि दगड वितळून तांबे काढले जाते.
मनुष्य अंधाराची कदर न करता; खूप दूर त्या दाट अंधकारात त्या धातूच्या दगडाचा शोध करीत असतो.
मनुष्यांच्या वसतीपासून दूर, जिथे मानवाच्या पावलांचा कधी स्पर्श झाला नाही, तिथे ते खोल खाण खणतात; व सर्वांपासून दूर घुटमळत व झोके घेत असतात.
पृथ्वी, जी आम्हाला अन्न देते, ती खाली अग्नीने पालटून गेली आहे;
तिच्या खडकातून नीलमणी येतात, आणि त्याच धुळीत सोन्याचे गोळे असतात.
कोणत्याही शिकारी पक्ष्यास तो गुप्त मार्ग माहीत नाही, कोणत्याही बहिरी ससाण्‍याची नजर त्यावर पडली नाही.
गर्विष्ठ श्वापदाने ना कधी ती आपल्या पायाखाली तुडविली, ना कोणत्याही सिंहाने त्यावर आपला पंजा ठेवला.
गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात आणि पर्वतांना समूळ उघडे करतात.
१०
ते खडकामधून भुयारे तयार करतात; आणि त्यांचे डोळे त्यातील मौल्यवान रत्ने पाहतात.
११
पाण्याच्या प्रवाहांना ते बांध घालतात आणि गुप्त गोष्टी उजेडात आणतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options