इय्योब २२:२३-२७
२३
जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्यातून दुष्टता काढून टाकशील: तर तू पुनर्स्थापित होशील.
२४
जर तू आपले सोने धुळीत मिळवशील, आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील,
२५
तर सर्वसमर्थ स्वतःच तुझे सोने, आणि तुझे मौल्यवान रुपे होतील.
२६
मग तू खरोखरच सर्वसमर्थामध्ये आनंद पावशील व आपली दृष्टी परमेश्वराकडे वर लावशील.
२७
तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील.
Settings