Skip to content
इय्योब २०:१२-२१

दुष्टपणा विषात परिवर्तित होतो

इय्योब २०:१२-२१
१२
“जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते आणि तो आपल्या जिभेखाली ते दाबून ठेवतो,
१३
ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते म्हणून हळूहळू चघळत राहतो,
१४
तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही; त्याच्या पोटात ते सापाच्‍या विषासारखे होईल.
१५
गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार; परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल.
१६
तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.
१७
मधाने भरलेल्या नद्या आणि झरे जे लोण्याच्‍या प्रवाहाने वाहतात, त्यांचा उपभोग त्याला घेता येणार नाही.
१८
ज्यासाठी त्याने परिश्रम केले, त्याची चव त्याला मिळणार नाही; त्याच्या व्यापाराचा नफा त्याला मिळणार नाही.
१९
कारण त्याने गोरगरिबांवर जुलूम करून त्यांना निराधार सोडले; जी घरे त्याने बांधली नाहीत, ती त्याने जप्त केली.
२०
“त्याच्या हावेपासून त्याला कधीही सुटका मिळणार नाही; त्याची संपत्ती त्याला वाचवू शकणार नाही.
२१
गिळून टाकावे असे आता काही उरले नाही; त्याची समृद्धी दीर्घकाल टिकणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options