Skip to content
इय्योब २०:२२-२९

दुष्टांवर देवाचा अकस्मात न्याय

इय्योब २०:२२-२९
२२
त्याच्या भरभराटीत विपत्ती त्याला गाठेल; आणि त्याच्यावर मोठ्या यातना येऊन पडतील.
२३
जेव्हा त्याने पोटभरून खाल्ले असणार, तेव्हा परमेश्वराचा प्रचंड कोप त्याच्याविरुद्ध पेटेल आणि त्याच्यावर त्यांच्या क्रोधाची वृष्टी होईल.
२४
लोखंडी शस्‍त्रांपासून त्याने जरी पळ काढला, तरी कास्य धनुष्‍यबाण त्याच्या पार जाईल.
२५
बाण त्याच्या पाठीतून तो ओढून काढेल, आणि त्याचे चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल. तो भीतीने ग्रस्त होईल.
२६
निबिड अंधकार त्याच्या संपत्तीची वाट पाहत आहे, अग्नी त्याला भस्म करेल आणि त्याच्या तंबूमध्ये जे काही उरलेले आहे ते गिळून टाकेल.
२७
आकाश त्याचे दोष प्रकट करेल; आणि पृथ्वी त्याच्याविरुद्ध उभी राहील.
२८
त्याचे घर पुराने वाहून जाईल, परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्याची सर्व संपत्ती पाण्याच्या ओघात नष्ट होईल.
२९
दुष्ट मनुष्याचा परमेश्वराने हाच वाटा नेमलेला आहे, परमेश्वराने त्यांच्याकरिता नेमलेला वारसा तो हाच आहे.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options