इय्योब १९:६-१२
६
तर ही गोष्ट लक्षात घ्या, की ही स्थिती परमेश्वराने माझ्यावर आणली आहे आणि आपल्या जाळ्यात मला वेढले आहे.
७
“मी जरी ‘जुलूम!’ असे म्हणून ओरडतो, परंतु मला प्रतिसाद मिळत नाही; साहाय्यासाठी मी बोलावितो, परंतु मला न्याय मिळत नाही.
८
मी पार जाऊ नये म्हणून परमेश्वराने माझी वाट अडविली आहे; त्यांनी माझे मार्ग अंधाराने झाकून टाकले आहेत.
९
माझा सन्मान त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतला आहे आणि माझ्या मस्तकावरील मुकुट काढून घेतला आहे.
१०
माझा सर्वनाश होईपर्यंत त्यांनी मला चहूकडून तोडले आहे; झाडाप्रमाणे त्यांनी माझी आशा उपटून टाकली आहे.
११
त्यांचा क्रोध माझ्याविरुद्ध भडकला आहे; आपल्या शत्रूंमध्ये त्यांनी मला गणले आहे.
१२
त्यांची फौज जोमाने पुढे जात आहे; त्यांनी माझ्याविरुद्ध युद्ध रचले आहे आणि माझ्या डेर्या सभोवती वेढा घातला आहे.
Settings