इय्योब १४:७-१२
७
“झाडाला देखील आशा असते: की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार, आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत.
८
मातीत त्याची मुळे जुनी झाली असली, आणि त्याचा बुंधा मातीत मृत झाला असला,
९
तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते आणि रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात.
१०
परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते; तो आपला शेवटचा श्वास घेतो आणि नाहीसा होतो.
११
जसे सरोवराचे पाणी आटते किंवा नदीचे पात्र आटून कोरडे होते,
१२
तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही; आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत, ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत.
Settings