इय्योब १४:१२-१५
१२
तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही; आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत, ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत.
१३
“तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते तुमचा क्रोध संपेपर्यंत मला गुप्त ठेवले असते! आपण माझ्यासाठी समय नेमून ठेवावा आणि मग माझी आठवण करावी!
१४
जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का? माझ्या सर्व कठीण श्रमाच्या दिवसात माझ्या सुटकेची मी वाट पाहीन.
१५
मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन; आपली हस्तकृती पुन्हा पाहावी असे तुम्हाला वाटेल.
Settings