Skip to content
इय्योब १२:१३-२५

इय्योब १२:१३-२५

१३
“ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत; सल्ला आणि समज त्यांचेच आहे.
१४
ते जे पाडतात, ते पुन्हा बांधता येत नाही; ते ज्याला बंदिवासात पकडतात, त्याला सुटका नाही.
१५
परमेश्वराने जर पाऊस रोखून धरला, तर दुष्काळ पडतो; आणि त्याला मोकळे सोडले, तर पृथ्वी उद्ध्वस्त होते.
१६
पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत; फसणारे आणि फसविणारे दोन्हीही त्यांचेच आहेत.
१७
ते मंत्र्यांना विवस्त्र करतात आणि न्यायाधीशांना मूर्ख ठरवितात.
१८
राजांनी टाकलेली बेडी ते तोडून टाकतात आणि त्यांच्या कंबरेस लंगोट बांधतात.
१९
ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात स्थिर झालेल्या अधिकार्‍यांना ते उलथून टाकतात.
२०
विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात आणि वडीलजनांचा विवेक काढून घेतात.
२१
ते सरदारांवर तिरस्कार ओततात, आणि सबळांना दुर्बल करतात.
२२
ते अंधारातील गुप्त गोष्टी प्रकट करतात आणि घोर अंधकाराला प्रकाशाने उजळून टाकतात.
२३
ते राष्ट्रांना महान करतात आणि त्याचा नाशही करतात; ते राष्ट्रे विस्तृत करतात आणि त्यांचा नायनाट करतात.
२४
ते पृथ्वीवरील अधिकार्‍यांची बुद्धी काढून घेतात; आणि त्यांना दिशाहीन असे भटकण्यास लावतात.
२५
ते अंधारात प्रकाशाविना चाचपडतात; त्यांना मद्यपीसारखे लटपटण्यास लावतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options