यिर्मयाह ८:१८-२२
१८
तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात, माझे अंतःकरण क्षीण झाले आहे.
१९
माझ्या लोकांचे आक्रोश ऐका दूर देशातून ते ऐकू येत आहे: “सीयोनेत याहवेह नाहीत काय? तिचा राजा तिथे नाही काय?” “त्यांनी कोरीव मूर्ती करून मला का संताप आणला, त्यांनी व्यर्थ परकीय दैवत का पुजले?”
२०
“हंगाम संपला, उन्हाळा सरला आणि तरीही आमचे तारण झाले नाही.”
२१
माझे लोक चिरडले गेले, मी चिरडलो; मी शोकाकुल झालो, भीतीने मला दहशत भरली आहे.
२२
गिलआदात काही औषध नाही का? तिथे कोणी वैद्य नाही का? मग माझ्या लोकांच्या जखमा तिथे बऱ्या का होत नाहीत?
Settings