यिर्मयाह ६:२६
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २६ दाखवत आहे.
२३
त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर असून दया दाखवित नाही. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे सीयोनकन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.”
२४
आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे, आणि आमचे बाहू निखळले आहेत. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे वेदनांनी आम्हाला ग्रासले आहे.
२५
शेतातून बाहेर जाऊ नका, किंवा रस्त्यांवरून प्रवास करू नका, कारण शत्रूकडे तलवार आहे, आणि प्रत्येक बाजूला आतंक पसरलेला आहे.
२६
माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा, आणि राखेत लोळा; एकुलत्या एका पुत्रासाठी आक्रोश करतो तसा आक्रोश कर. कारण संहारक सेना एकाएकी तुझ्यावर हल्ला करेल.
२७
“मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे. आणि माझ्या लोकांना अशुद्ध धातू, जेणेकरून तू त्यांना पारखावे, व त्यांच्या मार्गाची परीक्षा करावी.
२८
ते सर्व कठोर बंडखोर आहेत, निंदा करीत फिरत आहेत. ते कास्य आणि लोखंडासारखे; त्या सर्वांची वर्तणूक दूषित आहे.
२९
भट्टीचा भाता भयानकपणे वाजत आहे. शुद्ध करणारा अग्नी शिसे भस्म करीत आहे, परंतु हे शुद्धीकरण व्यर्थ होत आहे, दुष्ट मार्गानी चालणारे पूर्णपणे शुद्ध होत नाहीत.
Settings