यिर्मयाह ४९:३०-३३
३०
“लवकर दूर पळा! हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, याहवेह जाहीर करतात.
३१
“सज्ज हो आणि सुखात राहणार्या राष्ट्रांवर हल्ला कर, जे आत्मविश्वासाने जगतात,” याहवेह जाहीर करतात. “ज्या राष्ट्रांना प्रवेशद्वार नाही वा सळया नाहीत; त्यातील लोक धोक्यांपासून दूर राहतात.
३२
त्यांचे सर्व उंट लुटून नेले जातील, व त्यांचे मोठमोठे कळप युद्धाची लूट सामुग्री होतील. या मूर्तिपूजक लोकांची मी वाऱ्यागत पांगापांग करेन मी त्यांच्यावर चहूकडून अरिष्ट आणेन. याहवेह असे जाहीर करतात.
३३
हासोरात कोल्हे संचार करतील, ते कायमचे ओसाड होईल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; मनुष्य तिथे वस्ती करणार नाही.”
Settings