यिर्मयाह ४६:२१-२६
२१
तिच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक एखाद्या धष्टपुष्ट वासरांसारखे झाले आहेत. तेही वळून एकत्र पलायन करतील, ते भूमीवर टिकाव धरू शकणार नाही, कारण त्यांच्यावरील संकटाचा दिवस जवळ येत आहे, त्यांना शिक्षा मिळण्याचा हा समय आहे.
२२
जसे त्यांचे बलाढ्य शत्रूपुढे चाल करतील, जंगलतोड्यांगत येऊन त्यांच्यावर ते कुऱ्हाड घेऊन आक्रमण करतील. तेव्हा इजिप्त फुत्कारणाऱ्या सर्पाप्रमाणे पळ काढेल;
२३
याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल ते कापून नष्ट करतील. ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील, ज्यांची संख्या मोजता येणार नाही.
२४
उत्तरेकडील लोकांच्या तावडीत सापडलेल्या इजिप्तच्या कुमारिकेची लज्जा घालविण्यात येईल.”
२५
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्यांनाही शिक्षा करणार आहे.
२६
त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात.
Settings